मातोश्रींच्या निधनानंतर १९१८ साली महाराज विवाहबद्ध झाले.प्रपंचात येणाऱ्या प्रसंगांना धैर्याने सामोरे जाऊन,आपली उपासना कशी सातत्याने सुरुच ठेवायची,याबद्दल त्यांनी सौ.काकूंना बोध केला.
१९२५साली परमपूज्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य,परमपूज्य दामोदर बुवा कुरोलीकर हे बेळगाव येथे आले असता,त्यांच्या दर्शनासाठी जाण्याचा योग श्री महाराजांना आला.तसेच त्यांना श्रीरामाचा त्रयोदशाक्षरी मंत्रासह अनुग्रह लाभला.
सन १९२६पासून त्यांनी परमपूज्य गोंदवलेकर महाराजांच्या आज्ञेनुसार गोसेवा करण्यास सुरुवात केली आणि सातत्याने ३८ वर्षे ही सेवा सुरूच ठेवली.स्पष्ट आणि खणखणीत वाणी असल्याने एव्हाना श्रीमहाराज याज्ञिकी साठी प्रसिद्ध झालेच होते.
१९३२साली परमपूज्य गोंदवलेकर महाराजांच्या आज्ञेनुसार,श्रीमहाराज परमपूज्य नारायण महाराज केडगावकर यांना जाऊन भेटले.त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे ते मुंबईला परमपूज्य योगानंद महाराजांकडे पूर्ण दोन महिने राहिले.त्यांनी श्रीमहाराजांना नाम साधनेला उपयुक्त होईल, अशाप्रकारे योगशास्त्राचे शिक्षण दिले.