१९७५ साली गुरुपौर्णिमेच्या उत्सवानंतर अर्धांगवायूचा झटका आल्याने महाराजांनी अनेक वर्षे सुरू असलेले उत्सव आयोजन बंद करण्याचा निर्णय घेतला.महाराजांच्या सेवेसाठी अनेक भक्त आळीपाळीने येत असत.वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली औषध,व्यायाम आणि मर्दन,यामुळे त्यांच्या तब्येतीला थोडा आराम पडू लागला.त्यांचे दैनंदिन व्यवहारात (स्नान संध्यादी)त्यांनी कधी खंड पडू दिला नाही.विजयादशमीला पालखी सोहळ्यास ते बाळेकुंद्रीला आवर्जून गेले.सुमारे दोन वर्षे रोगोत्सव म्हणून आजारपण भोगल्यानंतर ३१ ऑक्टोबर १९७७ रोजी संध्याकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी महाराजांचे महानिर्याण झाले..