“आजार मगर मिठीतून मुक्तता ” ब. वा. शितूत( डोंबिवली)

1942 - 43 सालाची ही गोष्ट सौभाग्यवती जवळजवळ एक वर्ष आजारी होती. सर्व डॉक्टरी उपाय झाले, यश नाही. चिंताग्रस्त झालो काही सुचत नव्हते .श्रीराम गाडगीळ माझा परममित्र, त्याला हे सर्व माहिती होते. त्याने एक मार्ग सुचविला मी मान्य केले. इथेच माझ्या नशिबाला कलाटणी मिळाली, त्यांनी परमपूज्य काणे महाराजांचे नाव सुचवले व सर्व हकीगत पत्राने कळव असे सांगितले मी लगेचच महाराजांना पत्र लिहिले, चार दिवसात उत्तर आले ते असे --तुमच्या सौभाग्यवतींवर करणी केली आहे, कोणी केली ते मी सांगणार नाही, मी जे उपाय सांगीन त्याप्रमाणे करण्याची तयारी असेल तर कळवा. मी लगेचच त्यांना पत्र लिहिले, होकार कळवला. त्यांचे पत्र आले सौभाग्यवतीने रोज सकाळी अंघोळ केल्यावर श्री अश्वत्थाला अकरा प्रदक्षिणा तीन महिने पर्यंत करणे, त्यांना होणार नसेल तर तुम्ही स्वतः ती सेवा करावी.

सौभाग्यवती ला उठणे अशक्यच होते, म्हणून तीन महिने मी सेवा केली आणि फळ दृष्टिक्षेपात येऊ लागले आशेचा किरण दिसू लागला, पुढे पण ती सेवा तशीच चालू ठेवण्यास महाराजांनी सांगितले नंतर सौभाग्यवतीला घेऊन महाराजांचे दर्शनास गेलो, प्रथमच भेट झाली प्रश्न उत्तर झाली, चौकशी झाली सेवा चालू आहे ना? असे महाराजांनी विचारले सेवा अशीच सुरू ठेवा पुरे म्हणेपर्यंत चालू ठेवा. प्रकृतीत चांगलीच सुधारणा होऊ लागली, माझी पत्नी मार्गशीर्षातील उत्सवाला बेळगावला महाराजांच्या सांगण्यावरून गेली प्रकृतीची सुधारणा छानच झाली महाराजांनी स्वतः तिला अनुग्रह दिला तेव्हापासून आजारपणा आले नाही, संसार सुरळीत झाला श्रद्धा दृढ झाली विश्वास बळकट झाला.

जय जय रघुवीर समर्थ

आणखी वाचा कमी वाचा

* श्रीराम *

श्री दाजी दातार (डोंबिवली)

1970 साल जानेवारी महिन्यात आम्ही पक्षाच्या अधिवेशनासाठी मोटार ने पाटण्याला गेलो. पाटण्याहून पुढे पशुपती दर्शनास जाण्याची तयारी केली ,रक्सोल हे आपल्याकडील शेवटचे गाव ,तेथून पुढे नेपाळची हद्द सुरू होते. चेक नाक्यावरती गाडीची कागदपत्रे तपासणी झाली व प्रवासी म्हणून आम्हाला पुढे जाऊ दिले. जवळजवळ दीडशे मैल संपूर्ण रस्ता घाटी वळणेवळणे असाच होता. समोरून येणारी गाडी बरेच वेळा दिसत नसे अशाच एका कठीण वळणावर समोरून येणारी गाडी अर्धा फूट अंतरावर येऊन थांबली. काळ आला होता पण वेळ आली नव्हती.

“सद्गुरूंच्या कृपेचीच प्रचिती आली” पुढील प्रवास सुखरूप झाला. देवदर्शन झाले दोन दिवस इतर ठिकाणे पाहून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो सामान वगैरे बांधले .मोटारीतून निघणार तेवढ्यात लक्षात आले ठरवले असून सुद्धा पूज्य मी काणे काकांना पत्र लिहिले नाही, म्हणून परत हॉटेल मध्ये आलो. त्यांना पत्र लिहिले-- आज पर्यंतचा प्रवास आपल्या आशीर्वादाने निर्विघ्न पार पडला, परतीचा प्रवास सुखरूप व्हावा अशी श्री चरणी प्रार्थना करीत आहे असे पत्र पोस्ट टाकून, पूज्य महाराजांचे स्मरण करून आम्ही परतीला निघालो. निघण्यास थोडा उशीरच झाला होता उतार वळणे वळणे असाच रस्ता होता प्रवास सुखकर होता मध्ये चहा पान करून पुढे निघालो साडेआठ नऊ पर्यंत पोचू असा आमचा अंदाज होता पररस्त्यामध्ये एकदम काटकोनात वळण आले गाडीला वेग होता चालकाच्या हातात काहीच उरले नाही.

दुसऱ्या क्षणाला गाडी रस्त्याच्या खाली आली, डोंबारी जसा कोलांटी पलट्या घेतो तशी पलट्या घेत घेत गाडी खाली आली आणि चाकांवर उभी राहिली काय घडतंय हे हे कळलेच नाही कळण्याच्या आत सर्व झाले. मी गाडीच्या बाहेर उभा होतो वास्तविक मी पुढच्या सीटवर मध्ये बसलो होतो डाव्या बाजूचा दरवाजा उघडा होता त्यामुळे मी बाहेर कसा आलो हे मला समजलेच नाही.गाडीची पुढची काच बेपत्ता होती, दिवे चालू होते. गाडी उभी होती तेथे काचांचा खच चकचकत होता. सर्वांना जबर जखमा झाल्या असणार असेच प्रत्येकाला वाटत होते. प्रत्येक जण दुसऱ्याची चौकशी करू लागला, पण केवळ चमत्कारच घडला होता!! कारण कोणासही बारीक जखम सुद्धा झाली नव्हती ,आमच्या गाडीचा ब्रेक चा आवाज ऐकून बाजूला काम करणारी माणसे धावत आली सर्वांना सुखरूप बघून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी मदत केली, सामान सुमान तंबूत ठेवले व झोपण्यास सांगितले उजाडल्यावर पुन्हा चहा दिला . मग गाडी पाशी गेलो, धक्काच बसला आमची गाडी थोडी जरी पुढे गेली असती तरी नदीच्या पात्रातच पडली असती, केवळ सद्गुरू कृपेने आम्ही सुखरूप आहोत याचा प्रत्यय आला तेव्हाच समोरच्या झाडावर आमच्या गाडीची काच अलगद उचलून ठेवावी तशी अडकून बसलेली बघितली ही काच जर फुटली असती तर काय झाले असते त्याचा विचारही करवत नव्हता पुढे गाडी सुरू करण्यासाठी किल्ली लावली आणि आश्चर्य म्हणजे गाडी लगेच सुरू झाली.

गाडी सुरू झाली मनावरचे दडपण थोडे कमी झाले आमचा प्रवास सुरू केला त्याआधी आम्हाला मदत करणाऱ्यांना बक्षीसी द्यावी म्हणून इकडे तिकडे बघितले पण कोणीच दिसले नाही गुरुकृपेचे कौतुक करत आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली पुढे गाडीचे थोडे दुरुस्तीचे काम पाटण्यामध्ये करून सुखरूप घरी पोहोचलो लगेचच पूज्य महाराजांना भेटण्यास बेळगाव ला गेलो सद्गुरूंची कृपा असल्यावर प्रत्यक्ष काळाच्या मिठीतूनही ते आपणास बाहेर कसे काढतात याचा प्रत्यक्ष अनुभव आला त्यांची कृपादृष्टी सदैव आमचे वर राहो हीच श्री चरणी प्रार्थना जय जय रघुवीर समर्थ

आणखी वाचा कमी वाचा

श्री विद्याधर केतकर (कोथरूड, पुणे)

पूज्य श्री काणे महाराजांचे दर्शन मला ठाण्याला झाले. पुढे 13 फेब्रुवारी 1958 रोजी बेळगाव येथे महाराजांनी मला माळ आहे का असे विचारले मी नाही म्हणालो तर स्वतःची माळ देऊन जप करण्यास सांगितले दासबोध आहे का पण विचारले मी नाही म्हटल्यावर महाराजांनी स्वतः बाजारात जाऊन मला दासबोध आणून दिला व रोज एका अध्यायाचे वाचन करण्यास सांगितले मला खूप आनंद झाला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुण्याच्या गोडबोले यांच्या मुलीशी 26 डिसेंबर 1959 रोजी माझा विवाह झाला .त्याच दिवशी सद्गुरूंचे आशीर्वाद पत्र मिळाले.

“ उदईक आपण संसाराची प्रथम पायरी प्रमिलेला घेऊन चढत आहात तेव्हा ती पायरी भगवान नामाने मृदू करा आणि आनंदाने संसारात पदार्पण करा” माझा तुम्हा उभयतांना खालील शब्दात प्रेमाचा आशीर्वाद आहे दंपत्तीला सदभक्ती, नामीरती अखंड भक्ती, अविच्छन्न प्रीती ,आढळशांती, धर्मी प्रीती, आयुरारोग्य ऐश्वर्य आणि सुपुत्रानंद लाभो कळावे हा आशीर्वाद आपला.

श्री. प्र. काणे महाराजांचे आशीर्वादानेच माझा मुलगा बोर्डात आला नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मिळाली तो डॉक्टर झाला हे मी अनुभवत आहे.

पुढे 29 सप्टेंबर 1976 रोजी माझे डावे हातावर ट्यूमर साठी शस्त्रक्रिया झाली त्यावेळेस डॉक्टरांनी माझ्या त्या हाताची शीर तोडली त्यामुळे मला त्या हाताने काहीच करता येईना एक वेळ अशी आली की मला सक्तीची निवृत्ती घ्यावयास सांगितले जाणार होते परंतु श्री महाराजांचे कृपेने मला क्लार्क म्हणून काम करण्याची ऑर्डर मिळाली महाराजांनी सांगितलेली उपासना व त्यांचे स्मरण आपण केले तर आपली सर्व जबाबदारी ते घेतात असा माझा अनुभव आहे माझा मुलगा डॉक्टर संजीव यास पूज्य महाराजांनी तो सोळा वर्षाचा असताना अनुग्रह दिला व तसे त्यांनी एक वर्ष अगोदर मला सांगितले होते डॉक्टर संजीवला देखील महाराज आपल्या पाठीशी आहेत याचा वारंवार अनुभव येतो.

आणखी वाचा कमी वाचा

सौ. शैलजा केतकर (कोथरूड, पुणे)

माझी व श्री काणे काकांची भेट 1960 मध्ये पुणे येथे झाली. त्यांचे आशीर्वादानेच माझा विवाह श्री विद्याधर केतकर यांचे बरोबर झाला. ठाणे येथील आमच्या वास्तव्यात आलेल्या घरगुती अडचणी आम्ही उभयतांनी महाराजांच्या मार्गदर्शनाने सोडविल्या. त्यांच्या प्रवचनांचा, आरतीचा व श्री गुरुपाद पूजेचा लाभ आम्हाला गोखले यांचे घरी मिळाला.

" देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले”

“ नाही तरी हे व्यर्थ ची गेले नाना आघाते मृत्युपंथी ”
महाराजांनी संसारिक गोष्टीतून अनेकांची मने सहजगत्या परमार्थाकडे वळवली व नामस्मरण करूनच मनःशांती मिळते हे पटवून दिले जय जय रघुवीर समर्थ

आणखी वाचा कमी वाचा

वैद्य श्री दाजी सावंत (परळ, मुंबई)

1932 साली पूज्य बापूसाहेब गाडगीळ एलफिस्टन ला राहत होते पूज्य योगानंदजींचा मुक्काम तेथेच होता केडगावहून नारायण महाराजांनी योगानंदजीना भेटण्यासाठी श्री काणे काकांना पाठविले होते तेथेच माझे बंधू गणपत सावंत व माझी श्री काणे काकांशी प्रथम भेट झाली तेव्हापासून आमचे संबंध वाढत गेले मला अनुग्रह श्री बापू काका गाडगीळ यांचे घरीच मिळाला माझे वडिलांना बाहेरील बाधेचा खूप त्रास होता वडील व दादा वारल्यावर “आता गप्प राहून चालणार नाही तुझ्यावर गदा आहे” असे पूज्य काणे काकानी सांगितले.

काणे काका स्वतः माझे बरोबर नाशिकला आले दादरला गाडीत चढताना माझा पाय निसटला सद्गुरू कृपा म्हणून मी वाचलो पण पाय चांगला सुजला मुक्कामावर गेल्यावर ताप आला बेशुद्ध होऊन माझी बडबड सुरू झाली बाजूचे खोलीत गुरुमाऊली रात्रभर बसून होती माझ्या बडबडण्याला उत्तर देत होती सकाळी थोडा ताप हटला पायाची सूज कमी झाली सोबतच्या मंडळींबरोबर खांद्यावर दोन्ही हात ठेवून लोंबकाळात नदीवर गेलो ९वाजता विधीना सुरुवात झाली चार-पाच वेळा नदीवर जाऊन बुचकळावे लागले चार वाजता विधी पूर्ण झाला आणि आश्चर्य म्हणजे ताप व पायाची सूज यांचा मागमूसही राहिला नाही मी व्यवस्थित सुखरूप घरी आलो व बाधा देखील कायमची नष्ट झाली महाराज नेहमीच पाठीशी उभे असतात हेच खरे माझे कडून मात्र त्यांच्या सूचनेप्रमाणे नामस्मरण होत नाही.

पूज्य महाराजांबरोबर काशी यात्रेला आपणही जावे असे मला मनापासून वाटत होते अनेक अडचणी होत्या, काशी यात्रेला जाणाऱ्या मंडळींची यादी पूर्ण झाली होती, पण रहावे ना म्हणून गुरुमाऊलींकडे पत्राने यात्रेला येण्याची इच्छा प्रगट केली' त्यांचे उत्तर आले तुमच्या करता आमच्या गाडीत जागा आहे काहीही काळजी करू नका.यात्रेला निघण्याच्या तयारीत रहा, लगेचच फंडातून पैसे मिळवण्यासाठी अर्ज केला चार दिवसात पैसे हातात येऊन पडले. महिन्याची रजा ही मंजूर झाली. यात्रेत मथुरेला श्रीकृष्णांच्या दर्शनाकडे आमचे लक्ष वेधले होते इतक्यात तिथे एक व्यक्ती आली व मला म्हणाली बेळगावचे काणे महाराज कोठे आहेत? मी आत्ताच पंढरपूरहून आलो आहे आमचे लक्ष श्रीकृष्णांच्या मूर्ती कडे म्हणून -सांगितले डाव्या हाताने पुढे चला तिकडे ते बसलेले आहेत. पुढे ती व्यक्ती कोठे गेली लक्षात आले नाही परंतु पंढरीहून आलेली व्यक्ती म्हणून निदान आम्ही नमस्कार तरी करायला हवा होता पण---- मुक्कामावर गेल्यावर स्वतः महाराजांनी सर्व खुलासा केला साक्षात श्री पांडुरंगाची स्वतःची ती भेट होती!!!

माझे मुलीचे आजार, तिचे लग्न, बाळंतपण प्रत्येक वेळी महाराजांनीच आम्हाला सांभाळून घेतले महाराज नेहमी सांगत असत आमच्या अनुग्रहित असलेल्या सर्व व्यक्तींवर आमचे सतत लक्ष असते याचाच अनुभव मी नेहमी घेतो. “जय जय श्रीराम”

आणखी वाचा कमी वाचा

श्री दांडेकर (अंबरनाथ)

“सद्गुरु काका रक्षी मागेपुढे
सद्गुरु श्री काणे काका यांचा संबंध 1970 पासून आला पूज्य महाराजांनी बेळगाव ला आम्हा उभयतांना अनुग्रह दिला. आमचे एक नातलग श्रीनिवास पाटणकर विद्यार्थी दशेत आमच्याकडे राहत असे. त्यांचे कुटुंबात अंधत्व होते. तो स्वतः तसाच होता. लहानपणी थोडे दिसत असे, एकट्यानेच तो रेल्वेने तिकीट वगैरे काढून प्रवास करीत असे एक दिवशी त्याला घरी लवकर येण्याची घाई होती. त्याच्याकडे डोंबिवली ते अंबरनाथ तिकीट नव्हते.

तिकिटाविना त्याचा प्रवास सुरू झाला, तिकीट चेकिंग मास्तर कल्याण नंतर हजर झाला या मुलाकडे तिकीट नव्हते अंबरनाथ स्टेशनवर तिकिटाचे व दंडाचे पैसे देतो असे त्यांनी सांगितले इतक्यातच एक व्यक्ती पुढे आली व म्हणाली तू अंबरनाथला दांडेकरांकडे राहतोस ना मी ओळखतो त्यांना तेव्हा तुझ्या तिकिटाचे पैसे मी देतो मास्तरनी पैसे घेऊन रिसीट दिली त्या मुलाला कसेतरीच वाटले त्यांनी त्या गृहस्थांना नाव विचारले तुमचे घरी येऊन पैसे देतो असे सांगितले परंतु ती व्यक्ती त्याला म्हणाली पैशाची तू काळजी करू नकोस!!! मी दांडेकरांना ओळखतो ऑफिस मधून मी त्यांच्याकडून पैसे घेईन तू निश्चिंत मनाने घरी जा मुलांनी त्यांचे नाव विचारले तेव्हा माझे नाव काणे आहे, मला लगेच मुंबईला जायचे आहे असे सांगून ती व्यक्ती परतीच्या गाडीने निघून गेली. ही गोष्ट मला समजल्यावर मी ऑफिसमध्ये विचारले, सविस्तर वृत्तांत सांगितला पण त्यांचे पैकी कोणीच पैसे भरले नव्हते, बराच विचार करून घटनांचा अर्थ लावला तेव्हा सारे काही लक्षात आले साक्षात महाराजच मदतीला धावले हेच खरे !!मी काणे काकांना हा प्रकार कळवला. प्रत्यक्ष भेटीत तुमचे काम झाले ना ?एवढेच ते म्हणाले, केवढी ही कृपा!! दैनंदिन जीवनात कोणतीही अडचण उभी राहिली तरी महाराजांना साकडे घालतो अडचण सहज संपते हाच अनुभव येतो.

आणखी वाचा कमी वाचा

अपर्णा देशपांडे (पुणे)

ओम श्री राम समर्थ

माझा पहिला अनभुव म्हणजे माझे जेव्हा लग्न ठरले तेव्हा मी, माझे सासरे त्रिंबकराव देशपाांडे व आमचे हे ह्यांना पसंत होते.पत्रका जमत होती. पण माझे सासरे म्हणाले कि बेळगावला आमचे काणे महाराज आहेत, तुम्ही बेळगावला येत असाल तर आपण महाराजांना भेटू व त्याप्रमाणे ठरवू. आमचे तेथे घर आहे आम्ही जायचे ठरवले. महाराजांकडे गेल्यानंतर त्यांना नमस्कार केला. त्यांनी एक नारळ व पादूनकांवरील एक फुल माझ्या ओटीत घातले व सासऱ्यांना सांगितले मुलगी चांगली आहे, करून घ्या. देणं घेणं काही ठेवू नका. पण माझ्या मिस्टरांच्या मनात लग्न बेळगावला महाराजांसमोर व्हावे असे होते. त्यांनी महाराजांना विचारले. त्यांनी सांगितले, लग्न मुलीच्या दारातच करा. वेळ काळ काही सांगून येत नाही, आयत्या वेळेस अडचणी येतात.

त्या प्रमाणे लग्न गावी ठरले. लग्नाला आठ दिवस राहिले होते. पुढच्या रविवारी लग्न आणि आदल्या रविवारी मी आजारी पडले. एक नाकपुडीतून रक्त आले नंतर दोन्ही नाकपुडीतून रक्त यायला लागले व नंतर तोंडातून पण रक्त यायला लागले. तिथल्या डॉक्टरांना दाखवले तर म्हणाले पुण्याला ससून हॉस्पिटल ला न्या. त्यांनी नाक ब्लॉक केले, चार दिवसांनी परत ओपन केले तर तेवढेच रक्त गेले. असे करता शनिवार उजाडला. रविवारी लग्न होते. शनिवारी दुपारी रक्त थांबले. मला चक्कर येत होती पण माझ्या भावांनी डॉक्टरांना मला सोडण्याची विनंती केली व आम्ही निघालो. आमच्या मागून वर्हाडाची गाडी येत होती. सीमांत पूजन झाले. दुसऱ्या दिवशी लग्न लागले आणि महाराजांची आशीर्वादाची तार आली. तेव्हापासून आजपर्यंत काही झाले नाही. महाराजांचे म्हणणे खरे झाले. बेळगावला आम्ही पोहचू शकलो नसतो.

अनुभव दुसरा
माझा मुलगा शेखर ह्याच्या जन्माच्या वेळी ९ महिने होऊन वर १५ ते २० दिवस झाले होते तरी काहीच हालचाल नाही. शुक्रवारी डॉक्टर मागे लागले कि सीझर करा नाहीतर दोघांपैकी एकाला धोका आहे. माझ्या मिस्टरांना गुरुवारी सुट्टी असे. त्यांनी सांगितले कि दोन्ही मुली लहान आहेत, सासूबाई वयस्काराआहेत तर आपण गुरुवारी सीझर करू. तोपर्यंत ह्यांनी काकांना पत्र लिहिले. त्यावेळी लगेच उत्तर यायचे. काकांनी सांगितले कि सीझर करू नये, सर्व व्यवस्थित होईल. काळजी नसावी. पण मंगळवार उगवला तरी काही हालचाल नाही. पण महाराजांवर पूर्ण विश्वास होता. हे कामावरून ५:३० ला आले आणि संध्याकाळी ६ वाजता एकदम कळ आली आणि त्या कळा वाढत गेल्या. आम्ही ९ वाजता दवाखान्यात गेलो आणि १०:२५ ला मुलगा झाला. मुलगा १० पाउंड होता. डॉक्टर म्हणाले कि १० किलो पेढे दया . ह्यांनी काणे काकांना पत्र पाठविले. त्यांचे उत्तर आले कि सीझर केले असते तर आजचा आनंदाचा दिवस नसता, बाराव्या दिवशी बारसे करावे व नाव चंद्रशेखर ठेवावे. ३ महिने झाल्यानंतर काकांच्या दर्शनाला बाळाला घेऊन गेलो. काकांनी त्याला उघडे करून सर्व अंगाला अंगारा लावला आणि दूध पिण्यासाठी एक मोठे चांदीचे भांडे दिले, ते अजूनही आहे. आता त्याचा मुलगा शिवम त्याने दूध पितो.

आणखी वाचा कमी वाचा

निशा सामंत

श्रीराम
श्री सद्गुरु नाथ महाराज की जय

माझ्या लहानपणापासूनच मी माझ्या वडिलांना बघत आले आहे. महाराजां बद्दल ची आत्मीयता आदर त्यांच्यात पुरेपूर होता. तेव्हा सारे काही त्यांच्या बद्दल समजत नव्हते, म्हणजे त्याचे फारसे ज्ञान नव्हते. माझ्या वडिलांनी आमच्यावर सक्ती पण केलेली नव्हती, माझ्या आईची पण तेवढीच निष्ठा महाराजांवर होती. मी सोळा-सतरा वर्षांची असताना महाराजांनी देह ठेवला. महाराजांचे खूप अनुभव घेतले होते पण आम्हाला एवढी समज येण्याअगोदरच महाराजांनी देह ठेवला होता. तर जवळजवळ सात-आठ वर्षांनी परत महाराजांच्या कार्याला सुरुवात झाली. मध्ये माझे लग्न झाले. मला मुंबईत दाखवायला येताना महाराजांच्या फोटो समोर नारळ माझ्या वडिलांनी ठेवला होता. गादी वरील नारळ उभा फुटला महाराजांच्या मुलीने (सिंधुताईंनी) लग्न ठरल्याचे त्यावेळी सगळ्यांना सांगितले. लग्न करून मुंबईला आल्यावर घरच्यांच्या सांगण्यानुसार नोकरी शोधायला सुरू केले खूप प्रयत्न केले.

पण एक दिवस डोंबिवली कॉलेजचा एक शिपाई घरी आला व निशा सामंत कोण त्यांना इंटरव्यू ला बोलावले आहे. ताबडतोब असा निरोप घेऊन आला. मी गेल्यावर इंटरव्यू होऊन त्याच क्षणी तीन महिन्याच्या कामासाठी मला ठेवून घेतले. तीन महिन्यांची मुदत संपली तेव्हा त्या लोकांनी मुलांची संख्या वाढल्याने कायमस्वरूपी नोकरी मला दिली. महाराजांनी घर बसल्या मला नोकरी दिली नोकरी करत असताना आमच्याकडे एक स्टेनो होत्या. त्या रिटायर झालेल्या त्यांच्या सर्विस बुक मध्ये खूपच चढ-उतार केले गेले होते. त्यात सुधारणा करता आली असती, पण तसे वरच्या लोकांनी केले नाही माझ्या हाती त्यांची केस देऊन जमा करून ये असे सांगितले. ही केस होणार नाही असे सांगितले. पेन्शन तिला मिळणार नाही, असेही सांगितले. मनापासून देवाचं करणारी ती बाई तिला या प्रकारचा त्रास देणे मनाला पटलं नव्हते. मी घरी आले दुसऱ्या दिवशी महाराजांच्या समोर नारळ ठेवला व प्रार्थना केली यांची केस सरळ जाऊदे तुम्ही करून घ्या. आणि काय सांगू तीन टेबलांवर तपासण्यासाठी गेलेली फाईल कुठेही न थांबता पुढे गेली व पेन्शन सुरू झाली. विश्वास आणि श्रद्धा कशी ठेवावी हे मी माझ्या आई-वडिलांकडून शिकले. एकदा मी लहान असताना माझे वडील कमळे काढण्यासाठी तळ्यात उतरले त्यावेळी त्यांच्या पायाला इसब झाले. खूप त्रास झाला पायातून पाणी गळायचे अशावेळी महाराजांचा निरोप आला, बेळगाव ला या माझ्या वडिलांनी पायाला चिंध्या बांधल्या आणि घरातून बाहेर पडले. मिळेल ते ट्रक गाडी करत ते रात्रीच्या वेळीच बेळगाव ला पोहोचले. महाराज वाट बघत होते त्यावेळी त्यांच्या पायाकडे बघून काय झाले असे विचारताच माझ्या वडिलांनी सर्व हकीकत सांगितली महाराजांनी त्यांना त्यावर औषध सांगितले व ते केल्यावर ते इसब समूळ नष्ट झाले विश्वास आपण जर ठेवला तर आपल्याला घाबरण्याचे कधीच कारण पडणार नाही.

दुसरी गोष्ट अशी सांगायची झाली तर आमची वेंगुर्ल्याला बदली झाली आम्ही लहान होतो माझ्या आजोबांनी कोकणात पाऊल टाकू नकोस, असे माझ्या वडिलांना बजावून सांगितले होते. परंतु बदलीच्या निमित्ताने जाणे भाग होते माझ्या वडिलांनी महाराजांना विचारले, तर महाराज म्हणाले तू जा मी आहे तिथे आमची सोय एका नवीन बांधलेल्या बंगल्यात केली होती. आम्ही वेंगुर्ले ला गेल्यावर नवीन कोऱ्या बंगल्यात प्रवेश केला. बरोबरच च्या लोकांनी तो बंगला बांधताना चार-पाच वेळा कोसळलेला असल्याचे सांगितले. तेव्हा विचार करा व रहा असा सल्ला दिला तो बंगला बांधणारे आर्किटेक्ट रेडकर सहा महिन्याच्या आत हार्ट अटॅक ने गेले होते. या सगळ्याचा संदर्भ बघता तो बंगला बाधिक असावा असे सांगण्यात आले. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या वडिलांनी तिथेच मुक्काम करायचे ठरवले होते. आम्ही तिघे लहान मुलं व माझी आई, माझे वडील पंधरा दिवस परगावी असताना एकटेच राहायचो पण कधीही कुठेही आम्हाला त्रास झाला नाही. असे आम्ही पूर्ण तीन वर्ष तिथे काढले व तिथून निघालो नंतर समजलं की आमच्यानंतर त्या बंगल्यात कोण राहू शकले नाही.

2)
मे 2012 ला काश्मिर ट्रिप साठी गेलो होतो. अमृतसर पासून वैष्णव देवी असा प्रवास होता. आम्ही कटरा पर्यंत पोहोचलो वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आणि दुसऱ्या दिवशी श्रीनगर ला निघणार होतो. आम्ही बसमध्ये बसण्यास गेलो तर बस मध्ये एकच जागा आहे असे सांगण्यात आले काय करावे सुचत नव्हते. मुलगा तसा सतरा अठरा वर्षाचा होता. कोणीही काहीही सांगत नव्हतं. मी महाराजांना हात सोडले व सांगितले देशाच्या टोकाला आणून ठेवलं आता तुम्हीच आम्हाला घेऊन चला आणि काय झालं समजलं नाही मी त्या बसवाल्याला सांगितलं, माझी सोय झाल्याशिवाय मी बस जाऊ देणार नाही. मी हॉटेल वाल्याला भेटले तो खाजगी गाडी देतो म्हणाला. सहा हजार द्यावे लागतील असे सांगितले मी तयार झाले. मी आणि माझा मुलगा दोघेच गाडीने श्रीनगरला निघालो. ड्रायव्हर शेजारची सीट रिकामी होती, पण सतत असं जाणवत होतं तिथं महाराज बसले आहेत. अधून मधून आमच्याकडे बघत होते गाडी लागत असल्याने आम्ही जेवण खाण केले नाही म्हणून आमच्या ड्रायव्हर ने पण काहीच घेतले नाही. वाटेतील सगळी प्रेक्षणीय स्थान देऊळ त्यांनी आम्हाला दाखवली व रात्री सुखरूप हॉटेलवर सोडले.आमच्या टूर चा मालक वाट बघत होता. आम्हाला रूम मध्ये जेवण पाठवून आराम करायला सांगितला व सकाळी तयार रहा असे सांगितले सकाळी रूमचे बेल वाजली टूर मालक दारात उभे होते, ज्या गाडीने आम्ही आलो होतो त्याच गाडीने तुम्ही सगळा काश्मीर फिरा. असे सांगून गेले. टूरच्या शेवटी हाऊस बोटीवर मुक्काम करायचा म्हणून गेलो तिथे सगळ्या बोटी बुक होत्या आमचा बरोबरच्या सगळ्या लोकांशी संपर्क सुटला होता. आम्ही हॉटेल तर सोडले होते, कटरा पासून आलेला ड्रायव्हर आमची काळजी घेत होता. आम्हाला गाडीत बसवून तो एका माणसाला भेटून आला त्यांचे काय बोलणे झाले, आम्हाला माहीत नाही पण तो आला त्या माणसाच्या घरी जाण्यास सांगितले आहे. असे म्हणाला आम्ही श्रीनगरमध्ये नवीनच होतो काही माहीत नव्हतं त्याने आम्हाला हाऊस बोट असलेल्या मागील घरात नेले दोन दिवस आम्ही हाऊस बोटीवर राहिलो. सभोवतालच्या गुलाबांच्या भरलेल्या वातावरणात दोन दिवस कसे गेले समजले नाही .त्या घराचे मालक ज्यावेळी संध्याकाळी आले तेव्हा त्यांना आम्ही बघितले सहा फुटांपेक्षा उंच वयस्क पण ताठ माणूस होता. ते अत्यंत शांत होते आमच्या नाश्त्याचे जेवणाची सगळी सोय त्यांनी केली होती. एकही पैसा त्यांनी आमच्या कडून घेतला नाही .आम्ही निघालो तर मी वाट बघतोय फोनची पोचल्यावर फोन करा ,असे म्हणाले मी म्हणाले, त्यांना आम्हाला पोहोचायला मध्यरात्र होईल तुम्ही वाट बघू नका. पण त्यांनी ऐकले नाही आम्ही रात्री दोन वाजता घरी पोहोचलो डोंबिवलीला घरात गेल्याबरोबर मी फोन केला ते फोनची वाट बघत बसलेले होते ते माझे महाराजच असणार याबद्दल शंकाच नाही.

महाराजांच्या आदेशानुसार स्वगृही ते गुरुगृही पायी वारी करण्याचे ठरवले होते. डोंबिवली ते बेळगाव जवळ जवळ550 किलोमीटर अंतर आम्ही 4 जुलै 2019 ला सुरू केले. साठ वर्ष व त्याहून अधिक आम्ही 13 लोक मुंबई पुण्याचे अनुग्रहीत होतो. धुवांधार पावसात आम्ही चालत होतो. साधी शिंक सुद्धा कोणाला आली नाही. 19 दिवसाचा या वारीत आम्हाला महाराजांनी अगदी फुलासारखे अलगद घेऊन गेले होते. आपण कल्पना करू शकत नाही वाटेतले तीन घाट ते आम्हाला पार करून घेऊन गेले होते. यावेळी निघताना माझ्या मुलाच्या मणक्याचे साखळी सुटली होती मणके एकावर एक उतरले होते. त्याला वारीला यायचे होते डॉक्टरांनी सांभाळून जावयास परवानगी दिली दुखले तर पेन किलर दिल्या होत्या. कमरेला पट्टा लावून तो वारीला आला. गुरुपौर्णिमेचा उत्सव करून आम्ही डोंबिवली ला परत आलो. तेव्हा तो डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेला. त्याचे एक्स-रे काढण्यात आले तर डॉक्टर आश्चर्यचकित झाले. माझ्या मुलाचे मणके साखळीने जोडले गेले होते. डॉक्टरांना पण समजले नाही असे कसे झाले.

आणखी वाचा कमी वाचा

विवेक वासुदेव पिंपुटकर

"आम्ही सांगू त्या मुलीशी लग्न केलस तर संसार होईल, नाहीतर... संसारच होईल!", हे काणे महाराज (आजोबांचे) शब्द प्रमाण मानून सुरु झालेला बाबांचा प्रापंचिक प्रवास अगदी महाराजांनी सांगितल्याप्रमाणेच सर्वोत्तम झाला! प्रापंचिक अडचणीत आई - बाबांनी एकमेकांना दिलेली खंबीर साथ काकांच्या दूरदृष्टीची साक्ष पटवणारीच होती. महाराजांच्या मार्गदर्शनाशिवाय कुठलाही मोठा निर्णय घेतला जात नव्हता, कारण त्यांची महाराजांवर दृढ निष्ठा होती.

कितीतरी प्रसंगातून श्री महाराजांच्या मार्गदर्शनामुळे सही सलामत सुटका झाली होती! आम्हा मुलांच्या लग्नाचा निर्णय असो किंवा त्यावेळी करण्यात आलेल्या आर्थिक बेगमीचा विषय असो, महाराजांचा शब्द शेवटचा असे, अगदी "राहती जागा आम्ही सांगेपर्यंत सोडायची नाही", असे महाराजांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही ऐकले म्हणूनच आज स्वतःची कुवत नसतानाही एकाच्या दोन जागा त्यांच्या कृपेनेच आमच्या मालकीच्या झाल्या. आम्ही नुसते हात जोडून महाराजांसमोर जाऊन आपली व्यथा मांडावी अन् अगदी अघटितपणे अचंबित करणारे काहीतरी घडावे आणि आमची समस्या दूर व्हावी, हि नित्याचेच झाले आहे जणू! अर्थात यामागे माझ्या आजोबांची म्हणजे श्री. मधुबुवा पिंपूटकर, यांची मोठी पुण्याई आहे. त्यांच्या पुण्याईनेच आमच्या सारख्या त्यांच्या वारसदारांना काकांच्या परिवारात स्थान मिळालं. आमचे बाबा, श्री. वासूकाका, नेहमी म्हणत, "काणे काका तुमचे आधीचे सात आणि नंतर सात जन्म जाणतात आणि तुमच्या पूर्वसंचितानुसार तुम्हाला मार्गदर्शन करतात!", अगदी खरे आहे हे! अगदी जिवावर बेतलेल्या संकटांमधून देखील आम्हाला फुलासारखं जपलं आहे त्यांनी.

वानगीदाखलच सांगायचं झालं तर एकदा बाबा उत्सवाचे कार्यक्रम संपल्यावर बेळगाव वरून डोंबिवलीला येत होते, महाराजांच्या (त्यावेळी श्री. वसंत काका) सवयीनुसार त्यांनी कधी, कोणत्या गाडीने जाणार असे विचारले, त्या वेळी बाबांनी त्यांना अमुक अमुक वेळेस असलेल्या एसटी ने जाणार असल्याचं सांगितलं, तेव्हा श्री. काकांनी त्यांना महाराजांच्या पादुकांवरच चाफ्याचं फुल जाते वेळीस खिशामध्ये ठेवायला दिलं. प्रवासात बाबांना झोप लागली, पण मधेच कुठल्याशा गोंधळाने त्यांना जाग आली तेव्हा आजूबाजूच्या प्रवाशांकडून कळलं कि बस खोल दरीत पडता पडता वाचली होती. त्यांना एकदम धस्स झालं आणि त्याच वेळेस त्यांच्या खिशातल्या चॅफूचं सुवास आला आणि नकळत त्यांच्या डोळ्यातून काकांच्या साक्षात्काराने अश्रूच्या धारा वाहू लागल्या, असे आहेत आपले श्री. काणे महाराज!

आम्ही तर त्यांना आजोबाच संबोधतो कारण अगदी लहानपणा पासून त्यांना पाहिलंय, माझ्या आजोळी, आई बरोबर बेळगावला जात होतो तेव्हापासून "या" आजोबांना बघितलंय, माझ्या आजोबांची कै. श्री. त्र्यंबक देशपांडे याची देखील खूप श्रद्धा होती महाराजांवर , त्यामुळे माझ्या आईला श्री महाराज लहानपणापासूनच पाहत होते आणि तिच्यातली सात्विकता जिवंत होते,म्हणूनच जेव्हा तिने या गाचा निरोप घेतला, तेव्हा तिच्या सेवेची आणि श्रद्धेची दाखल घेत त्यांनी तिच्या मरणोत्तर तिला स्वामींच्या पादुका प्रसाद भेट दिल्या! कारण तेच...! तिची आणि बाबांची पुण्याई आम्हा पुढच्या पिढीच्या कमी यावी म्ह्णून...! कारण, "जिथे स्वामी पाय, तिथे न्यून काय!"

परामचैतन्य श्रे कानी महाराज कि जय

आणखी वाचा कमी वाचा

श्री राम समर्थ

मैं बहराम जागीर जी भाड़ा टी आर मिस्त्री साहिबा का जमाई हूं श्री kane महाराज का मुझे जो अनुभव हुआ है वह बताना है. मैं गुजरात का उदवाड़ा गांव का रहने वाला हूं और मैं पारसी ब्राह्मण हूं. मैं मुंबई में नौकरी करने आया उसे 65 साल हो गए. उस समय मैं श्री मिस्ट्री साहेब से मिला. मेरी शादी मिस्त्री की बेटी महरु के साथ हुई काका की मर्जी से. और मुझे तीन लड़की हुई. मैं और मिस्त्री जी kane काका महाराज से मिलते थे. जब kane महाराज मुंबई आते थे तब हमारे घर पर भी आते थे. एक बार काकू और उनकी बहन भी साथ में आए थे. मैं मेरे फैमिली के साथ डोंबिवली पेन से काका के यहां जाया करता था. एक बार मैं मिस्त्री साहब और मेरा फैमिली बेलगांव गए थे. जाते समय रिजर्वेशन मिला था लेकिन आने के टाइम नहीं मिल सका. काका बोले आप लोग कोल्हापुर से गाड़ी लेना. वहां जगह मिल जाएगी taxi से जाना.

पूछताछ करते पता चला कि taxi का ₹500 होगा उस जमाने में. अब मिस्त्री जी और मैं सोचने लगे के इतना पैसा तो नहीं है क्या करेंगे. हम तो हमारी धर्मशाला में रुके थे और काका महाराज उधर हमारा प्रॉब्लम समझ गए. और दूसरे दिन श्री गोविंद पुरोहित जी के पास ₹500 भेज दिए. और बोला इनके साथ टैक्सी में कोल्हापुर जाना और ट्रेन में बैठा कर आना. इस तरह हमारी मदद करके हमें जगह दिला दी. एक अनुभव हुआ था. अभी मुझे 61 साल से कुछ ना कुछ काका के साथ अनुभव होते रहता है. हम कुछ भी काम करने जाए और उनका नाम लेकर जाते हैं तो काम सफल होता है. ऐसे गुरु जी अपने शिष्य की रक्षा करते हैं. मुझको काका ने अनुग्रह दिया उसको आज 48 इयर्स हो गया है. मैं उनके आशीर्वाद से मेरी फैमिली के साथ सूखी हुई. मैं मिस्त्री जी के साथ उत्सव में pendse काका के यहां डोंबिवली जाया करते थे. अभी जब हो सके तो जाते हैं. क्योंकि बेलगांव दूर है वहां नहीं जा सकते इसलिए यहां जाते हैं.

जय श्री राम.

आणखी वाचा कमी वाचा

नीलूफर

ओम श्री राम समर्थ

मैं बहराम और महरु की बेटी नीलूफर. मैं kane महाराज जी को बहुत मानती हूं. मेरा एक अनुभव शेयर करना चाहती हूं. हम तीन बहने न्यूजीलैंड में थे हॉलीडे पर. और जैस्मिन मेरी दीदी को बंजी जंपिंग करना था जिसके लिए मैं बहुत घबरा रही थी. मैं उसका वीडियो ले रही थी लेकिन मैं इतनी घबराई हुई थी और नॉन स्टॉप kane महाराज को जय श्रीराम जय श्रीराम करके याद कर रही थी.. मेरा वीडियो तो पता नहीं कौन से डिडक्शन में गया लेकिन मेरी दीदी मजा करके नीचे तो आ गई. लाइफ में पहली बार इतनी घबराई हुई थी जब मैंने उसको उधर से jump मारते हुए देखा तो मैं बहुत ही डर गई थी. होटल जाने के बाद श्रीपति जी का फोन आया जब के हमको कभी उनका फोन नहीं आता था. बस इतना पूछने के लिए कि सब कुछ ठीक है. वह मेरा एक एक्सपीरियंस के kane काका मेरे साथ है और मेरी बात सुनी और मुझे पूछा कि हम लोग सब ठीक है कि नहीं. और अब मैं बिल्कुल घबराती नहीं मैं बस करते जाती हूं जो करना है उनको याद करके मुझे इतना विश्वास है कि वह मेरे पीछे है मेरे साथ है हमेशा..


Mrs. Behram Ji

जय श्री राम

मैं मेहरू मिस्त्री जी की बेटी और बहराम की पत्नी हूं. अनुभव यह हुआ कि जिस दिन हमारी शादी थी अक्षय तृतीया के दिन 14 में 1964 को. उस दिन शाम को बहुत जोर से तूफान आया और बारिश हुई और हम घबरा गए कि क्या होगा उतने में kane महाराज का टेलीग्राम मुबारकबाद का आया शादी के हॉल में और तूफान थम गया और लग्नकार्य अच्छे से हो गया ऐसी गुरु जी की महिमा है.