दशग्रंथांची पारायणे झाल्यानंतर दर वर्षी मार्गशीर्ष उत्सवात अठरा पुराणांची पारायणे सुरू झाली. १९४९साली पद्मपुराणचे वाचन सुरू असताना बेळगावातील परमपूज्य गोंदवलेकर महाराजांचे सांप्रदायिक असलेले तातंभटजी कपिलेश्वरी यांच्याकडून महाराजांना परमपूज्य गोंदवलेकर महाराजांच्या पादुकांचा लाभ झाला.अशाप्रकारे प्रत्यक्ष गोंदवलेकर महाराजच पादुका रूपाने घरी वास्तव्यास आले.यानंतर दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील उत्सवात विविध ग्रंथांची पारायणे,याग,अनुष्ठाने, अभिषेक असे कार्यक्रम सुरू झाले. त्यातील काही ठळकपणे नमूद करण्यासारखे म्हणजे भागवत, रामायण,हरिवंश इत्यादी ग्रंथांची पारायणे तसेच भागवताच्या दशम स्कंधाचा स्वाहाकार,ऋग्वेद संहिता स्वाहाकार महारुद्र स्वाहाकार, सहस्त्रचंडी हवन चोवीस लक्ष गायत्री अनुष्ठान, आणि हवन करविले.श्रींच्या पादुकांवर विविध फळांच्या रसाचा अभिषेक करविला. गणेश यागामध्ये एक लक्ष मोदकांचे हवन, वाल्मिकी रामायणाच्या प्रत्येक श्लोकास सुक्या खोबर्याचे हवन,उत्सवाच्या दहा दिवसात १२५ सत्यनारायण पूजा, श्रीसुक्ता चे हवन आणि पादुकांवर बत्तीस हजार आवर्तनांनी नारळाच्या पाण्याचा अभिषेक करण्यात आला. १०००० रुद्र आवर्तने संततधार जलाभिषेकाने केली. गुरुचरित्राची २२५ पारायणे,ज्ञानेश्वरीची १०८ पारायणे,दासबोधाची १०८ पारायणे, एकनाथी भागवताची १०८पारायणे, तुकाराम गाथेची १०८ पारायणे करवून घेतली. १९६५ पासून मात्र महाराजांनी उत्सवाचे स्वरूप बदलून अखंड नामस्मरण आणि
जय जय दत्तराज महाराजl
जय जय गुरुराज महाराजll
या मंत्राचा अहोरात्र भजन,पहारा सुरू केला.

प्रवचन
नेहमीच प्रसिद्धी परांगमुख असलेल्या आपल्या महाराजांनी जेव्हा त्यांना परमपूज्य गोंदवलेकर महाराजांनी "बोला" अशी आज्ञा केली, त्यानंतरच त्यांनी आपल्या भक्तांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शनपर प्रवचने करण्यास सुरुवात केली.या सर्व प्रवचनांची कालांतराने "सुखसंवाद माला" या शीर्षकाखाली छपाई झाली. विविध विषयांवर बोलताना महाराजांनी सातत्याने नाममहिमेचाच जयघोष केला.


परमचैतन्य श्री काणे महाराज

kanemaharaj.org या वेब साईट मधून,सश्रद्ध भक्तांना परमचैतन्य सद्गुरु श्री.काणे महाराज यांचे जीवन दर्शन,त्यांनी आपल्या प्रवचनामधून भक्तांना केलेला उपदेश आणि त्यांचे साहित्य याची ओळख करून देत आहोत.

श्री राम मंदिर

परमचैतन्य श्री काणे महाराज
1721 , केळकर बाग रामदेव गल्ली बेळगाव - 590001.

+917760673434
+918313558125
+91 9137798474

smrutigandh2022@gmail.com

कनेक्ट विथ मीडिया

Youtube