श्रीगुरु दरबार सेवा मंडळ या विश्वस्त संस्थेमार्फत सामाजिक बांधिलकी म्हणून,गरीब रुग्णांना आर्थिक सहाय्य केलं जातं.तसेच दहावी,बारावीमध्ये विशेष प्राविण्य दाखवणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार,गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके यांचे वाटप केलं जातं.दरवर्षी वेगवेगळ्या वेदमूर्तीचा मानपत्र आणि अनुदान देऊन सत्कार करण्यात येतो.