पहाटे पाच वाजता प्रार्थनापूर्वक श्लोक म्हणून मंदिर गाभारा आणि पादुका मंदिराचे दरवाजे उघडून दीप प्रज्वलन.याच वेळी नामधाम येथील महाराजांची बैठकीची खोलीही उघडली जाते.सकाळी सहा वाजता मंदिर सर्वांसाठी उघडले जाते.
सकाळी आठ वाजता रुद्रासह अभिषेक,शाश्वतपूजा केली जाते

दुपारी साडेबारा वाजता महानैवेद्य आणि आरती करून देवाच्या वामकुक्षिसाठी गाभारा बंद केला जातो.

दुपारी चार वाजता प्रार्थना पूर्वक श्लोक म्हणून गाभाऱ्याचा दरवाजा उघडतात. दासबोधाचा एक समास आणि तेरा मनोबोधाचे श्लोक पठण करतात.

दर रविवारी ५ ते ६ जप .

संध्याकाळी साडेसात वाजता नित्य आरती,रामपाठ,भजन इत्यादी करून महाराजांचे दैनंदिन प्रवचन वाचन होते.

रात्री सव्वानऊ वाजता करुणाष्टके,भजन करून प्रार्थनेचे श्लोक म्हणून देवांना निद्रिस्त केलं जातं