सन १९७७ साली महाराजांनी देह ठेवल्यानंतर,त्यांची कन्या श्रीमती सिंधूताई यांनी गुरुपौर्णिमा आणि महाराजांची पुण्यतिथी असे उत्सव साजरे करण्यास सुरुवात केली. महाराजांचे कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी भक्त मंडळींनी २५ डिसेंबर १९८५ साली श्रीगुरुदरबार सेवा मंडळ या नावाने विश्वस्त संस्थेची स्थापना केली आणि महाराजांचे उपास्य दैवत श्रीराम आणि महाराजांच्या पादुका यांची स्थापना करण्यासाठी मंदिर निर्माण करण्याचे ठरविले. ३०/४/१९८८ रोजी भूमिपूजन करून मंदिर बांधकामास सुरुवात झाली.श्रीराम पंचायतन आणि गजानन अशा मूर्ती जयपूरहुन आणल्या.त्यांची बेळगावच्या सीमेवरून मंदिरापर्यंत नामघोषात मिरवणूक काढली गेली.१०/४/१९८९ रोजी रामनवमीच्या सुमुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिराची कळस स्थापना कांची पिठाचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांच्या हस्ते २०/४/१९९० रोजी झाली.